Breaking News

कामोठ्यात भव्य मिसळ महोत्सव; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कामोठे भाजपतर्फे आयोजित भव्य मिसळ महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 25) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. हा महोत्सव 27 मार्चपर्यंत चालणार असून यामध्ये खवय्यांना वेगवेगळ्या चविष्ट मिसळींचा आस्वाद घेता येणार आहे. भाजप कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी आणि युवा नेते हॅप्पी सिंग यांनी भव्य मिसळ महोत्सवाचे आयोजन पोलीस ठाण्यासमोरील मैदानात केले आहे. या ठिकाणी प्रवेश विनामूल्य आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास भाजप कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास घरत, डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, भाजप नेते के. के. म्हात्रे, आर. बी. म्हात्रे, गोपीनाथ गोवारी, भाऊ भगत, प्रकाश पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, महिला मोर्चा मंडल अध्यक्ष वनिता पाटील, भटक्या विमुक्त जमाती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मिसळ महोत्सवास भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply