Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते

नवी दिल्ली ः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जगभरातील 13 नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अ‍ॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने यासंबंधी सर्वेक्षण केले होते, ज्यात पंतप्रधान मोदींना 70 टक्के गुणांकन मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी, जर्मनीचे चान्सलर अँजेला मर्केल, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यासह 13 देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply