पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या वतीने भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व पनवेल बारचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या मागणीवरून गुरुवारी (दि. 16) कोविशिल्डचा दुसरा डोस वकिलांना देण्यात आला. या वेळी बार असोसिएशनच्या 175 वकिलांनी त्याचा लाभ घेतला.
पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, उपाध्यक्ष अॅड. जे. डी. पाटील, अॅड. प्रल्हाद खोपकर, विशाल डोंगरे, धनराज तोकडे, प्रशांत भुजबळ व संदीप बटवाल यांनी पनवेल महापालिकेकडे वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि न्यायाधीश यांच्यासाठी कोविशिल्डचा दूसरा डोस देण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये ज्या वकिलांचे पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेत त्यांच्यासाठी कोविशिल्डचा दूसरा डोस देण्याची व्यवस्था सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत केली होती. त्याचा वकील संघटनेच्या 175 सदस्यांनी त्याचा लाभ घेतला.