Breaking News

काशीदच्या समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

मुरूड : प्रतिनिधी

काशीद येथील समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. 27) असाच प्रकार घडला. पनवेल तालुक्यातील उलवे येथे राहणारे मोहंमद सादिक गनी (25) यांचा येथील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

उलवे येथील आठ लोक काशीदला आले होते. दुपारी सर्व जण एका झाडाखाली भोजनास बसले. त्या वेळी मोहंमद गनी हे मी फिरून येतो असे सांगून गेले, मात्र सायंकाळपर्यंत परत न आल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार मुरूड पोलीस ठाण्यात देण्यात आली. अखेर गनी यांचा मृतदेह समुद्रकिनारी आढळून आला. याबाबत अधिक माहिती देताना मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले की, हे सर्व अलिबाग जिल्हा न्यायालयात साक्षीसाठी आले होते. साक्ष लवकर झाल्याने सर्वांनी काशीद समुद्रकिनारी येण्याचा निर्णय घेतला. यातील गनी यांना पोहण्याचा मोह झाला असावा व पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply