कर्जत : बातमीदार
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री कपालेश्वर मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या शिबिरात 201 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या वेळी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला.
या लसीकरण शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शखाली रूपेश लाड, पूनम जगडुळे, रूपाली कांबळे, शाहीन मुजावर, संकेत पाटील यांनी लसीकरण केले. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी शिबिरास भेट दिली. मंडळाचे कार्यकर्ते जयदीप देऊसकर, अभिजीत मराठे, संदीप भोईर, अमित मराठे, आशिष गोखले, रोनक कोठारी, निलेश परदेशी, योगेश लोवंशी, पंकज शहा, सदानंद जोशी, किशोर वैद्य, सोहम जोशी, मंगेश जोशी, मिलिंद खंडागळे, दत्ता गुरव, अनिल शहा आदींनी हे लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.