मुंबई : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव संकल्पना साकार करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या निर्देशानुसार महानिर्मितीतर्फे (शासकीय वीज निर्मिती करणारी कंपनी) विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत विविध खुल्या राज्यस्तरीय स्पर्धांची घोषणा करण्यात येत आहे. यामध्ये खाली नमूद केलेल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा विषय : पर्यावरण संवर्धन / अपारंपरिक उर्जा; राज्यस्तरीय संशोधनात्मक निबंध स्पर्धा विषय : वीज क्षेत्रातील अभियांत्रिकी स्थित्यंतरे / नवीन व नवीकरणीय अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रामधील अभिनव संशोधन (फक्त अभियांत्रिकी पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांसाठी), राज्यस्तरीय खुली लघुपट / दर्जेदार मोबाईल क्लिप निर्मिती स्पर्धा : कालावधी मर्यादा 5 मिनिटे व विषय : राष्ट्रनिर्मितीत महिलांचे योगदान/ऊर्जेचे अपारंपरिक स्त्रोत-नव संकल्पना/ ऊर्जा आणि मानव असा आहे. सर्व स्पर्धांसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल 2022 रोजी असून राज्यातील अधिकाधिक स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन महानिर्मितीतर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धांबाबत सविस्तर माहिती तसेच नियम व अटी याकरिता महानिर्मितीचे संकेतस्थळ ुुु.ारहरसशपले.ळप येथे ङरींशीीं अपर्पेीपलशाशपीं मध्ये अथवा रज्ञर्राीीीांरहरसशपले.ळप या ई-मेल वरती संपर्क साधावा असे महानिर्मितीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांच्याद्वारे आवाहन करण्यात आले आहे.