Breaking News

खालापूर लोक अदालतमध्ये एक हजार प्रकरणे निकाली

खालापूर : प्रतिनिधी

खालापूर दिवाणी न्यायालय येथे लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यात 1143 प्रकरणांचा निकाल लावून एक कोटी 20 लाख 27 हजार 694   रुपयांची वसुली करण्यात आली.

खालापूर येथे दिवाणी कनिष्ठस्तर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. सदर राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दिवाणी, फौजदारी, वादपूर्व प्रकरणे व गुन्हा कबुली अशी एकूण 4299 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1143 प्रकरणे निकालात काढून सुमारे सव्वा कोटी वसुली करण्यात आली.

पंच म्हणून दिवाणी न्यायाधीश आर. डी. बावले, सहदिवाणी न्यायाधीश पी. एम. माने, सहन्यायाधीश एल. के. सपकाळ, सचिव तथा विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल यांनी काम पाहिले. वकिलांकडून सिद्धेश जितेकर, स्वाती म्हात्रे, पी.एल.व्ही. अधिकारी संजय सांगले, मिलिंद पारठे, तर सरकारी वकील कल्पना फोंडके, सहअधीक्षक सुभद्रा चव्हाण यांनी कामकाज पाहिले. एकूण वसुलीपैकी ग्रामपंचायत घरपट्टी 73,83,366 व पाणीपट्टी 5,74,540  एवढी वसुली करण्यात ग्रामपंचायत विभाग यशस्वी झाला. उर्वरित खोपोली नगरपालिका व खालापूर नगरपंचायत यांची वसुली झाली.

वकील मिलिंद सुरावकर, सचिन चाळके, विकास म्हात्रे, दांडगे, शहनवाज खान, मयूर कांबळे, आरती गुप्ता, सरिता वाघमारे व अन्य वकील, तसेच न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित राहून कामकाज सुरळीत पार पडले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply