Sunday , February 5 2023
Breaking News

चेन्नई एक्स्प्रेस सुसाट! कोलकात्यावर मात
अबूधाबी ः वृत्तसंस्था
आयपीएलमधील अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकात्याला दोन गडी राखून नमवले. कोलकात्याने सात गडी गमवून विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नईने आठ गडी गमवून पूर्ण केले. या विजयासह चेन्नईचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला. शेवटच्या षटकात आक्रमक खेळी करत रवींद्र जडेजाने संघाला विजय मिळवून दिला. जडेजाने आठ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 22 धावा केल्या. कोलकाताने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसिसने पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. ऋतुराज 40 धावा करुन परतल्यानंतर फाफ ड्युप्लेसिसही 43 धावा करून माघारी फिरला. त्यानंतर मोईन अलीने 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अंबाती रायडू 10, सुरेश रैना 11 आणि महेंद्रसिंह धोनी अवघ्या एका धावेवर परतल्यानंतर सामना कोलकाताच्या बाजूने झुकला होता, पण रवींद्र जडेजाने दोन चौकार आणि दोन षटकार खेचत सामना पुन्हा चेन्नईच्या बाजूने वळवला. अखेरच्या षटकात सुनील नरेन याने त्याला पायचीत करीत सामना परत एकदा रंगतदार स्थितीत आणला, पण लॉर्ड शार्दुल ठाकूरने कोणतीही चूक न करता संघासाठी विजयी धाव घेतली.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply