Breaking News

पावसाचा व्यत्यय; भारत 1 बाद 132

भारत-ऑस्ट्रेलिया महिला कसोटी

गोल्ड कोस्ट : वृत्तसंस्था

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक डे-नाईट कसोटी मेट्रिकॉन स्टेडियमवर खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूने खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर 2017 मध्ये एकमेव डे-नाईट टेस्ट खेळली होती. 

सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात दिली. मंधानाने केवळ 51 चेंडूत 1 चौकारांच्या मदतीने अर्धशतक केले. भारताने 15 षटकांत बिनबाद 70 धावा केल्या. शतकी भागीदारी पूर्ण करण्याआधी भारताने शफालीला गमावले. मोलिनक्सने तिला वैयक्तिक 31 धावांवर बाद केले. त्यानंतर पूनम राऊतसह स्मृतीने भारताचे शतक फलकावर लावले. भारताने 1 बाद 132 धावा केल्या. स्मृतीने नाबाद 80 धावा केल्या आहेत. पूनम राऊत 16 धावांवर नाबाद आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे टी ब्रेक घेण्यात आला.

भारतीय संघ : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, पूनम राऊत, मिताली राज (कर्णधार), यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंग आणि राजेश्वरी गायकवाड.

ऑस्ट्रेलिया संघ : एलिसा हीली (यष्टिरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), एलिस पेरी, ताहलिया मॅक्ग्रा, एश्ले गार्डनर, अन्नाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेयरहॅम, डार्सी ब्राऊन आणि स्टेला कम्पबेल.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply