कर्जत : बातमीदार : भाजपच्या कर्जत तालुका कार्यालयीन चिटणीसपदी कळंब भागातील कार्यकर्ते परशुराम म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी म्हसे यांना नियुक्तीपत्र दिले.
भाजपच्या कर्जत मंडल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, तालुका सरचिटणीस प्रवीण पोलकम, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, भाजप प्रज्ञा प्रकोष्ट कोकण विभाग संयोजक नितीन कांदळगावकर, राजाराम शेळके यांच्यासह कर्जत मंडलमधील सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
परशुराम म्हसे हे तालुक्यातील वारे ग्रामपंचायतचे माजी सदस्य असून कळंब भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. भाजपचे कर्जत तालुका कार्यालय कर्जत मुद्रे भागात आहे.