Breaking News

रसायनीच्या जान्हवी पाटीलला तायक्वांदोत ‘रौप्य’

मोहोपाडा : वार्ताहर

रसायनी परिसरातील देवळोली गावात राहणारी जान्हवी जयदास पाटील हिने तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे. टायगर तायक्वांदो अ‍ॅकडमीच्या वतीने रायगड व मुंबईसाठी तायक्वांदो चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 17 वर्षांखालील 64 ते 68 वजनाखालील गटात जान्हवी जयदास पाटील हिने व्दितिय क्रमांक पटकावून रोप्यपदक जिंकले.

या स्पर्धेत रसायनीतून 52 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. जान्हवीने तायक्वांदोच्या शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेतही व्दितीय क्रमांक पटकाविला होता. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. जान्हवीला प्रशिक्षक सचिन माळी यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply