Breaking News

आमदार महेश बालदींनी घेतली एमआयडीसी प्रशासनासोबत बैठक; मतदारसंघातील विषयांसंदर्भात चर्चा

मुंबई : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आमदार महेश बालदी यांनी अंधेरी येथे एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. या वेळी आमदार महेश बालदींनी त्यांच्या मतदारसंघातील नागरी समस्या सोडविण्यासंदर्भात एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना निवेदन दिले. बालदी यांनी निवेदनात म्हटले की, माझ्या उरण विधानसभा मतदारसंघातील आपल्या विभागाशी संबंधित अनेक विषय प्रलंबित असून ते सोडवावेत. यामध्ये पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायतीकरिता नवीन पाणी कनेक्शन अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक वसाहतीच्या चावणे पाणीपुरवठा लाइनवरून मिळावे. कसळखंड ग्रामपंचायतीला एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाइपचा व्यास वाढवून मिळावा. रसायनी विभागातील शेतकर्‍यांच्या जमिनी 30 वर्षांपूर्वी एमआयडीसीने अधिग्रहण केल्या आहेत, परंतु त्या भूखंडांवर कंपनी (कारखाने) बनविले गेले नाहीत. त्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्धतेबाबत चर्चा करावी. ग्रुप ग्रामपंचायत मोहोपाडा (वासांबे) येथील तळेगाव पानशील या गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा करावा. मोहोपाडा येथील खानेआंबिवली, आळीआंबिवली या गावांना एमआयडीसीमार्फत अपुरा पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाइपचा व्यास वाढवून द्यावा. एमआयडीसी अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीला आमदार महेश बालदी यांच्यासोबत गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, मोहोपाड्याचे माजी सरपंच सचिन तांडेल, कसळखंडचे माजी उपसरपंच रोहित घरत, गुळसुंदेचे सरपंच हरेश बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, सदस्य मनोज पवार, युवा कार्यकर्ते दत्ता गायकर, जयदत्त भोईर, केतन जाधव, लाडीवलीतील ज्येेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर कार्लेकर आदी उपस्थित होते. एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी या निवेदनातील विषयांवर आमदार महेश बालदी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली. एमआयडीसीने गुळसुंदे ग्रामपंचायतीला नवीन कनेक्शन देणे मान्य केले, तसेच कसळखंडसाठी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाइपचा व्यास वाढवून देणार असल्याचे मान्य केले. यामुळे ग्रुप ग्रामपंचायत कसळखंड हद्दीतील आष्टे, शिवाजीनगर, अरिवली, फणसवाडी या गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होईल.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply