Breaking News

सचिन तेंडुलकरला पाहून पोलिंग ऑफिसरने साधली संधी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये सोमवारी (दि. 21) मतदान झाले. सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार, क्रिकेटपटूंनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही मतदान केले. मतदानासाठी मतदान केंद्रावर आलेल्या सचिनसोबत एक मजेशीर प्रसंग घडला.

वांद्रे पश्चिमेतील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसोबत सचिन पोहोचला होता. सचिनला मतदान केंद्रावर आल्याचे पाहताच एक पोलिंग अधिकारी लेदरचा बॉल घेऊन सचिनकडे गेला आणि त्या बॉलवर सचिनची स्वाक्षरी मागितली. सचिननेही त्या अधिकार्‍याला निराश केले नाही. त्या लाल रंगाच्या बॉलवर सचिनने स्वाक्षरीही केली. आवडत्या क्रिकेटपटूची स्वाक्षरी मिळाल्याने पोलिंग ऑफिसरचा आनंदही द्विगुणीत झाला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply