Breaking News

पुढील तीन महिने सणांचे; आरोग्याबाबत सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली ः देशातील कोरोनाबाबतची आव्हाने अद्याप संपलेली नाहीत. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक या पाच राज्यांत कोरोनाचे 10 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हटले आहे तसेच शासनाने म्हटले आहे की, तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाच लाख ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील कोरोनाबाबतचे आव्हान अद्याप संपलेले नाही. काही प्रमाणात आपण कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. आपल्याला कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज आहे. पाच राज्ये (केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक) जिथे 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय प्रकरणे आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply