Breaking News

न्हावा शेवा बंदरातून 125 कोटींचे हेरॉईन जप्त; ‘डीआरआय’ची कारवाई

उरण ः प्रतिनिधी
प्रवासी जहाजावर अमली पदार्थ (ड्रग्ज) घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) केलेली कारवाई ताजी असतानाच उरणमधील न्हावा शेवा बंदरातून तब्बल 125 कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने (डीआरआय) ही कारवाई केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून 25 किलोंहून अधिक हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. जयेश संघवी (वय 62, रा. नवी मुंबई) असे या व्यावसायिकाचे नाव असून तो इराणमधून शेंगदाणा तेलाच्या खेपेत हेरॉईनची तस्करी करीत होता. डीआरआयच्या अधिकार्‍यांनी न्हावा शेवा येथे इराणहून आलेला एक कंटेनर ताब्यात घेतला आणि 4 ऑक्टोबर रोजी त्याचा शोध घेतला. या व्यावसायिकाला 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply