Breaking News

श्री धावीर महाराजांच्या पालखी उत्सवाला परवानगी

आयोजकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर

रोहे : प्रतिनिधी

श्री धावीर महाराज पालखी उत्सवाच्या दरम्यान  कुठेही गर्दी होऊ नये यासाठी आयोजकांनी लक्ष द्यावे. व भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी रोहे येथे केले.

रोहा अष्टमी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये नुकताच श्री धावीर महाराज पालखी उत्सवासंदर्भात बैठक घेण्यात आली. कोरोनाचे नियम पाळत, सुरक्षेची काळजी घेत श्री धावीर महाराज पालखी उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे या वेळी प्रशासनाच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कल्याणकर उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.

या पालखी उत्सवादरम्यान अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी यांनी सांगितले. शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून आम्ही पालखी उत्सव साजरा करू, अशी ग्वाही श्री धावीर ट्रस्टचे मकरंद बारटक्के यांनी या वेळी दिली. पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी लोकप्रतिनिधी, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, श्री धावीर ट्रस्टचे पदाधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. दरम्यान, श्री धावीर महाराज पालखी उत्सवाला परवानगी दिल्यामुळे नागरिक व श्री धावीर भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply