Breaking News

युनिफाईट नॅशनल चॅम्पियनशिप 2022 : महाराष्ट्र युनिफाईट वेलफेअर असोसिएशन प्रथम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

युनिफाईट नॅशनल चॅम्पियनशिप 2022चे आयोजन युनिफाईट इंडियन असोसिएशन हिमाचल प्रदेश येथील पालमपूर येथे 21 आणि 22 मे दरम्यान आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र युनिफाईट वेलफेअर असोसिएशन यांना राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे अजिंक्यपद प्राप्त झाले. या स्पर्धेत महाराष्ट्र, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या राज्यातून 359 पेक्षा जास्त खेळाडूनी भाग घेतला होता. वेदांत कायंदेकर, प्रद्युम्न म्हात्रे, रोहित भोसले, वरद केणी, समिक्षा कायंदेकर, कृपाश्री शेट्टी, सई शिंदे, यश जोशी, मधुरा गायकवाड, अलोक निर्मल, अर्णव शेट्टी, प्रणब कांबळे, नाविन्य साळगावकर, साहिल कुलते, वरद कालंगे, रोहित मालविया, सुजय वेंगुर्लेकर, यश जोशी आणि रितुल म्हात्रे यांनी सुवर्णपदक पटकावले. रजत पदक विजेते रुद्रा चौधरी, दिपेश जाधव, तेजस मोहिते, कृष्णा पांडे, श्रेयस म्हात्रे आणि यश पाटील ठरले तर कांस्य पदक विजेते श्रुधी सुपे, ध्रुव वनकर यांनी पटकावले. या सर्व खेळाडूंची निवड रशिया येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. या सर्व खेळाडूंचा सत्कार युनिफाईट वेलफेअर असोसिएशनचे सचिव आणि मार्गदर्शक डॉ. मंदार पनवेलकर, अध्यक्ष संतोष खंदारे, सुनील वडके, रविंद्र म्हात्रे, सागर कोळी, निलेश भोसले, प्रशांत गांगर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. टीम मॅनेजर म्हणून अविनाश डांगरे यांनी काम पाहिले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply