Breaking News

भाजपचा कार्यकर्ता म्हणून अधिक सक्षमपणे काम करा; आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल शहर बूथ क्रमांक 411ची बैठक आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा गुुरुवारी (दि. 7) आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी त्यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशीला घरत, सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका वृषाली वाघमारे, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप नेते जगदिश घरत, जितेंद्र वाघमारे, बूथ अध्यक्ष किशोर वाहुळकर, गौरी पवार, चंद्रकांत मंजुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आकुर्ली येथेही बूथ क्रमांक 536ची बुथ कमिटी बैठक भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. विठ्ठल मंदिरात झालेल्या या बैठकीला जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, आकुर्लीचे सरपंच सचिन पाटील, उपसरपंच सत्यवान धर्णेकर, माजी सरपंच पद्माकरबुवा पाटील, ज्येष्ठ नेते सदाशेठ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply