Breaking News

परतीच्या पावसाने भाज्यांचे नुकसान

श्रीवर्धनमध्ये भाव कडाडले, गृहिणींचे बजेट कोलमडले

श्रीवर्धन : प्रतिनिधी

परतीच्या पावसाचे पाणी तुंबून शेतामध्ये असलेल्या भाज्या कुजल्या आहेत. परिणामी बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत.

श्रीवर्धनमध्ये नेहमी 25 ते 30 रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो सध्या 60 ते 80 रुपये किलो दराने विकले जात आहेत. गवार 120 रुपये किलो विकली जात आहे. कोथिंबीर जुडी 80 रुपयांवर जाऊन पोचली आहे. सिमला मिरची, फ्लॉवर, फरसबी यांचे भावदेखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. वांगी, कोबी, हिरवी मिरची, आले, लिंबू यांच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. लसूण दोनशे रुपये किलोने विकली जात असून कांदा 60 रुपये किलो झाला आहे. तर बटाटे 30 रुपये किलो झाले आहेत.

बाहेरील बाजारातून श्रीवर्धनमध्ये भाज्यांची आवक कमी झाली आहे तर तालुक्यात पिकणार्‍या भाज्या बाजारात येत नाहीत. त्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहते. भाव वाढल्यामुळे भाजी विक्रीमध्येही मंदी आल्याचे  विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply