मुंबई ः प्रतिनिधी
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेकडे आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा 4 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे रंगणार आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मुंबईचा 20 जणांचा चमू जाहीर करताना पृथ्वी शॉकडे उपकर्णधारपदाची सूत्रे सोपवली आहेत. डावखुरा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकणार आहे. असा आहे संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, आदित्य तरे, सर्फराज खान, अरमान जाफर, हार्दिक तामोरे, तुषार देशपांडे, अथर्व अंकोलेकर, शाम्स मुलानी, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, प्रशांत सोळंकी, अमान खान, मोहित अवस्थी, साईराज पाटील, तनुष कोटियन, दीपक शेट्टी, रॉयस्टन डायस.