किकबॉक्सिंग स्पर्धेत पनवेलचे खेळाडू चॅम्पियन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग असोसिएशनने पनवेल येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत युनायटेड शोटोकान कराटे असोसिएशनच्या स्थानिक खेळाडूंनी 20 सुवर्ण आणि चार रौप्य अशी एकूण 24 पदके जिंकून चॅम्पियनशिप पटकावली. या स्पर्धेत प्रद्युम्न म्हात्रे, रोहित भोसले, आरव शेट्टी, नवीन पडवाळ, राहुल देशमुख, प्रतीक पोखारकर, प्रणय दुरकर, शशांक शेट्ये, निलेश सपकाळ, प्रेम वेणूपुरे, मानस वाघमारे, शिवप्रेम जुवाले, श्रीनिवास पाटील, उदय आव्हाड, हर्षदा दिवकर, साक्षी मर्ढेकर, अनुष्का थांबड, आयुरी धुमाळ, वैष्णवी मर्डेकर, अनुष्का जगदाळे यांनी सुवर्णपदक, तर वीर मुंबारकर, अधिराज माने, आयुष मीना, आस्था चौधरी यांनी रौप्यपदक जिंकले. त्यांना मुख्य प्रशिक्षक प्रशांत गांगर्डे व प्राची पवार रोहित भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. रायगड किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष मंदार पनवेलकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply