Breaking News

मंदा म्हात्रेंच्या आमदार निधीतून रुग्णालयातील एमआरआय मशीन

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयांमध्ये एमआरआय चाचणी मशीन उपलब्ध करण्याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या  आमदार निधीतून एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह चर्चा केली आहे.

या संदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालय तसेच महापालिकेच्या इतर मोठ्या रुग्णालयात एमआरआय मशीन नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात एमआरआय चाचणी कराव्या लागत आहेत. वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयांमध्ये एमआरआय चाचणी मशीन नसल्याने रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्यास जावे लागत आहे. खाजगी रुग्णालये त्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत आकारात आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचेही  हाल होत आहेत.

वाशी येथील रुग्णालयात बेलापूर ते वाशी सह मुंबई, ठाणे, पनवेल, उरण येथूनही अनेक रुग्ण दररोज उपचारासाठी येत आहेत. असे असताना सर्व सुविधांयुक्त अशा रुग्णालयात एमआरआय चाचण्या होत नाहीत. ही बाब लक्षात घेता एमआरआय चाचणी मशीन उपलब्ध व्हावी, याकरिता मशीन खरेदीसाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एक कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply