Breaking News

टाकेदेवीत नवरात्रोत्सवात मोफत चहापाणी व्यवस्था

आमदार महेश बालदी यांचे भाविकांनी मानले आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवरात्री उत्सवात दांड फाटा येथील टाकेदेवी देवीचे 20 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या सौजन्याने मोफत चहा पाण्याची सुविधा देण्यात आली होती. याबद्दल भाविकांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले.

दांड फाटा येथील टाकेदेवी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी येथे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी नवरात्रौत्सवानिमित्त दांडफाटा येथे टाकेदेवी मातेच्या दर्शनाला येणार्‍या सर्व भाविकांना मोफत चहा पाण्याची सेवा उपलब्ध करून दिली होती. त्या अनुषंगाने 17 हजार 800 चहा व 23 हजार पाणी ग्लासचे वाटप या ठिकाणी झाले आणि त्याचा भाविकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्यामुळे भाविकांनी आमदार महेश बालदी यांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.

Check Also

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …

Leave a Reply