Breaking News

स्वदेशी वस्तू वापरण्याचा तरुणाईचा निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त
चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालतानाच 2022 साली येत्या 75व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत रोजच्या जीवनात वापरल्या जाणार्‍या वस्तूंपैकी किमान 75% भारतीय बनावटीच्या (मेड इन इंडिया) वापरण्याची ऑनलाईन प्रतिज्ञा रविवारी (दि. 21) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांसमवेत अनेक युवक-युवतींनी घेतली.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाने प्रभावित होऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत’ या स्वदेशी वस्तूंचा वापर रोजच्या जीवनात वाढविण्यासाठीचा उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चाने हाती घेतला आहे. या अनुषंगाने तरुणाईने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून गुगल मीट अ‍ॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने शपथ घेतली. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून सहभागी झालेले आमदार प्रशांत ठाकूर आणि युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तरुण-तरुणींना मार्गदर्शन केले.
भारताबाहेर बनणार्‍या उत्पादनातून परदेशातील लोकांना रोजगार मिळवण्याची व पैसा कमावण्याची संधी देण्यापेक्षा अशा वस्तूंचे भारतात बनणारे उत्तम दर्जाचे व किफायतशीर पर्याय कोणते याची माहिती देणारे व जनजागृती करणारे ‘आत्मनिर्भर युवा, आत्मनिर्भर भारत’ या नावचे फेसबुक पेज व ग्रुप भाजप युवा मोर्चाने तयार केलेले आहे. या फेसबुक पेजवर कोणीही चौकशी केल्यास आपल्याला लागणार्‍या वस्तूंचा भारतात तयार होणारा पयार्यदेखील सूचवला जाईल अशी व्यवस्था भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांनी केली असल्याची माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली. त्याचबरोबर मॉल व इतर दुकानांनी चिनी बनावटीच्या वस्तू विकण्यासाठी घेऊ नये, यासाठी त्यांना भेटून जनजागृती करीत स्वदेशी वस्तूंचा प्रचार व प्रसार करणार असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply