Breaking News

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात येणार्या अभ्यागतांसाठी नियमावली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात येणार्‍या अभ्यागतांना भेटण्याच्या वेळांत प्रशासनाने बदल केले आहेत. नव्या नियमाप्रमाणे दुपारी 3 ते 6 या वेळांत भेटता येणार आहे. याची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली, मात्र नागरिकांनी याला विरोध दर्शवला.

नवी मुंबई महापालिकेने दोन दिवसांपूर्वी कोरोना आणि सुरक्षिततेकरिता नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात महापालिका मुख्यालयासाठीही नियमावली करण्यात आली आहे. मुख्यालयात याआधी कोणीही येऊन आंदोलने, निदर्शने करीत होते, याचा त्रास प्रशासनाला होत असे. यामुळे नवी नियमावली करण्यात आली आहे, मात्र गुरुवारी पहिल्याच दिवशी सकाळी प्रवेशद्वारावर आलेल्या नागरिकांना सुरक्षा रक्षकांनी अडवले. त्यामुळे सुरक्षा रक्षक व नागरिक व ठेकेदार यांच्यात वाद झाले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मध्यस्थी करून नागरिकांना शांत करीत त्यांना प्रवेश देण्यात आला.

मुख्यालयात कोणीही कोणत्याही वेळी येत असते. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्या कामावर परिणाम होतो. कामे रेंगाळत होती, तसेच कोरोनाच्या अनुषंगानेही गर्दी होऊ नये म्हणून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे.

-संध्या अंबादे, उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा विभाग

Check Also

पनवेलमध्ये शनिवारी युवा निर्धार मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल विधानसभेच्या वतीने शनिवारी (दि. 26) सायंकाळी …

Leave a Reply