बाजारात होत असलेले चढउतार हा बाजाराचा स्थायीभाव आहे. अशा बाजारात त्याच्या मूडची पर्वा न करत आपल्या विश्लेषणावर ठाम विश्वास ठेवून गुंतवणूक सुरू ठेवणे, हाच बाजारातून पैसे मिळविण्याचा मार्ग आहे. याचे प्रत्यंतर गेले काही दिवस येतेच आहे आणि पुढील काळातही ते येतच रहाणार आहे.
राजेश आणि सुरेश हे दोन मित्र होते आणि त्यांना एकाच कंपनीत नोकरी मिळाली होती. वर्षभरानंतर राजेशला बढती मिळाली आणि सुरेशला नाही. सुरेशने तक्रार केली असता केवळ काम पुरेसं नाही, असं त्यास उत्तर देण्यात आलं. प्रात्यक्षिक म्हणून, त्यांच्या वरिष्ठानं सुरेश आणि राजेश यांना बाजारात केळी विक्रेते किती आहेत ते तपासण्यास सांगितलं. सुरेश परत आला आणि म्हणाला, केवळ एकच केळी विक्रेता आहे. बॉसनं त्याला परत जाऊन केळीचे भाव तपासायला सांगितले. तो पुन्हा गेला आणि 60 रुपये डझन असे उत्तर घेऊन परत आला. आता बॉसनं राजेशला विचारलं आणि त्यानं उत्तर दिलं की केवळ एकच केळी विक्रेता असून त्यास 60 रुपये डझननं केळी विकायची होती आणि जर कोणाला त्याची सर्व केळी म्हणजेच 30 डझन विकत घ्यायची असतील तर तो 30 प्रति डझनला विकायला तयार आहे. म्हणून, जर त्यांनी संपूर्ण 30 डझन केळी खरेदी केल्यास आणि ती अगदी 55 ला विकू शकल्यास त्यांना नफा म्हणून 750 रुपये कमावता येतील. हे उत्तर ऐकल्यावर सुरेशच्या लक्षात आलं की फक्त मेहनत पुरेशी नाही, तर चाणाक्ष विचार करणंही गरजेचं आहे.
आज, आम्हाला नेहमी असंच वाटतं की शेअरबाजार आपल्यापुढं एक पाऊल आहे आणि त्यास पराभूत करणं खूप कठीण आहे. जरी हो गोष्ट खरी असली तरी जर आपण आपल्या पद्धतीनं बाजारामध्ये गुंतवणूक करत राहिलो आणि बाजाराच्या मनमानी लहरींवर स्वार न होता टिकून राहिलो तर आपणही बाजारास मागं टाकू शकतो. याचा ताजा अनुभव आयआरसीटीसीमध्ये सरकारी हस्तक्षेप, त्यानंतर शेअरच्या किंमती कोसळणं आणि पुन्हा सरकारकडून आपल्या निर्णयावर घुमजाव झाल्यानं शेअरच्या किमतीत तळापासून 20 टक्क्यांची वाढ.
बाजाराच्या मूडची पर्वा करावी काय?
त्यामुळं बाजारातील भय आणि लोभ यांबद्दल वॉरेन बफे यांच्या सोप्या म्हणी लक्षात ठेवा. 1972 ते 2021 या कालावधीतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन’च्या ग्राहक आत्मविश्वास निर्देशांकाच्या आलेखावरूनही हे सिद्ध झालं आहे की, जेव्हा जेव्हा बाजारात (खालील उदाहरणात अमेरिकेच्या डझ 500 निर्देशांकाचा आलेख) नकारात्मक सेंटीमेंट होती तेव्हा पुढील एका वर्षामध्ये बाजारानं चांगला परतावा दिलेला दिसतो. उदाहरणार्थ, 2001, 2008 व 2020मध्ये जेव्हा बाजारातील भावना नकारात्मक होत्या, तेव्हा पुढील एका वर्षाचा परतावा अनुक्रमे 18 टक्के, 27 टक्के आणि 23 टक्के इतका सकारात्मक होता. त्याचप्रमाणे, बहुतेक कालावधीत, जेव्हा भावना सकारात्मक होत्या, तेव्हा पुढील एका वर्षात परतावा नकारात्मक होता. अशा प्रकारे, जेव्हा बाजारातील भावना सकारात्मक किंवा नकारात्मक असतात तेव्हा अति उत्साहीत किंवा निराश होऊन बाजारातून बाहेर पडण्यात काहीच अर्थ नाही. तात्पर्य : “बाजाराच्या मूडची पर्वा न करता, तुमच्या विश्लेषणाद्वारे घेतलेल्या तुमच्या स्वतःच्या निर्णयानं निश्चित गुंतवणूक करत रहा” – प्रभा.
परकीय गुंतवणूकदारांमुळे पडझड
19 ऑक्टोबरच्या 62245 शिखरावरून शुक्रवारी सेन्सेक्सनं 59100 पातळीखाली डुबकी लावली असून तांत्रिकरीत्या सेन्सेक्सला 58800 व 55800 या पातळ्यांवर आधार संभवतो. सेन्सेक्सच्या 30 शेअर्समधून सर्वांत पडझड अनुभवलेले शेअर्स म्हणजे हिंद-युनिलिव्हर, टीसीएस व एचसीएल टेक जे एका महिन्यात अनुक्रमे 12 टक्के व प्रत्येकी 10-10 टक्के खाली आले आहेत. तर निफ्टी 50 मध्ये प्रतिनिधित्व करणारा आयशर मोटर्सचा शेअर 14 टक्के पडला आहे. एकूण क्षेत्रनिहाय विचार केल्यास सरकारी क्षेत्रातील बँकांच्या निर्देशांकानं गेल्या एका महिन्यात 17.8 टक्के वाढ नोंदवली आहे तर निफ्टी एफएमसीजी निर्देशांकानं 6 टक्के झळ सोसलेली आहे.
मागील आठवड्यात बाजारात विक्रीचा दबाव राहिला आणि यात परकीय गुंतवणूकदार आघाडीवर होते. एकूणच ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या विक्रीचा आकडा 25572 कोटी रुपये असून गेल्या आठवड्यातील विक्रीचा आकडा 15702 कोटी रुपये आहे. याला कारणं अनेक असू शकतील. एकूणच जगभरात महागाईचे असलेले वारे, कच्च्या तेलाच्या वरील पातळीवर स्थिरावणार्या किमती आणि याचबरोबर सुमारे 47500 कोटी रुपयांचे आयपीओ येत असल्यानं त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांनीदेखील नफावसुली करून पैसे काढून घेण्यावरच भर दिलेला दिसतोय.
‘फिनो पेमेंट’ बँकेचा आयपीओ
गेल्या दोन लेखांत आपण नायका आणि पेटीएम यांच्या आयपीओबद्दल जाणून घेतलं, तर आज आपण जाणून घेऊ अजून एक चांगल्या व असाधारण कामकाजाद्वारे आपली छाप पाडणार्या ‘फिनो पेमेंट’ बँकेबद्दल.
या कंपनीची सुरुवात 2007मध्ये फिनटेक फाऊंडेशननं केली असून 2017मध्ये कंपनीस आरबीआयकडून पेमेंट बँकेची परवानगी मिळाली. यामध्ये आयसीआयसीआय बँक, भारत पेट्रोलियम व आंतरराष्ट्रीय ब्लॅकस्टोन या दिग्गज कंपन्यांची गुंतवणूक आहे. ही एक झपाट्यानं वाढणारी फिनटेक फर्म आहे, जी डिजिटल आर्थिक उत्पादनं आणि सेवांमध्ये पेमेंटवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. साधारणपणे साडेसहा लाखांवर बँकिंग सुविधा केंद्रे, 54 बँक शाखा आणि 143 ग्राहक सेवा पॉइंट्ससह, फिनो पेमेंट बँक भारतातील 94 टक्के जिल्हानिहाय क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. ही कंपनी स्वतःची मालमत्ता बनवण्यात रस ठेवत नसून त्यांच्याकडं कमी-मालमत्तेचे (लाईट ऍसेट क्लास)कंपनी मॉडेल आहे जे प्रामुख्याने त्यांच्या व्यापारी नेटवर्क आणि लक्ष्य ठेवलेल्या व्यावसायिक करारांमधून फी आणि कमिशनच्या उत्पन्नावर अवलंबून राहते. प्रत्येक व्यापारी त्याच्या समुदायाच्या बँकिंग आणि आर्थिक गरजा पूर्ण करतो, त्यांच्या सहाय्यक-डिजिटल इकोसिस्टमचा कणा बनवतो, ज्याला त्यांचे फिजिटल वितरण मॉडेल (भौतिक आणि डिजिटल यांचे मिश्रण) म्हणूनही ओळखले जाते. अशा व्यापार्यांचा तंत्रज्ञानाचा वापर (टच पॉईंट्स), तसेच कंपनी गोळा करत असलेल्या. डेटावर विश्लेषणाचा वापर केल्यामुळं विद्यमान क्लायंटला थर्ड पार्टी सेवांची क्रॉस-सेल करण्याची क्षमता पुरवते ज्यामुळं महसूल वाढण्यास मदत होऊन एकूण उत्पादन आणि सोल्यूशन ऑफरिंग आणखी सह-अनुकूलित करता येतं, जेणेकरून कंपनीच्या ग्राहकास बँक सुविधा मिळवण्यासाठी कोणत्याही बँकेत जाऊन आपला वेळ खर्च करण्याची गरज भासणार नाही तर अगदी जवळच्या किराणा दुकानदार, कॉफी शॉप, मेडिकल स्टोर्स, मिठाई दुकान, अशा व्यवसायिकांना बँक आपले एजंट बनवून अशा ठिकाणांहून सुद्धा ग्राहकांच्या पेमेंट गरजा पूर्ण करत असून याचप्रकारे कंपनी आपलं नेटवर्क विस्तृत करत आहे. असंख्य चालू आणि बचत खाती (”उअडअ”), डेबिट कार्ड जारी करणं आणि लिंक केलेले व्यवहार, देशांतर्गत पैसे पाठवणं, खुली बँकिंग वैशिष्ट्यं (ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसद्वारे (”अझख”), (मायक्रो-एटीएमद्वारे किंवा आधार सक्षम पेमेंट सिस्टम (”अशझड”) आपल्या बँक खात्यात पैसे जमा करणं व काढणं, विमा, बिलं भरणं, पैसे भरणं किंवा काढणं आणि रोख व्यवस्थापन सेवा (उचड) ही कंपनीची उत्पादनं व प्रमुख सेवा आहेत. त्याखेरीज, कंपनीचे किरकोळ विक्रेते त्यांच्या समुदायांमध्ये त्यांचे विद्यमान क्लायंट कनेक्शकनदेखील वापरतात त्यामुळे त्यांच्या समुहामध्ये कंपनीस अतिरिक्त आर्थिक उत्पादने आणि सेवा जसे की थर्ड-पार्टी गोल्ड लोन, विमा, बिल पेमेंट आणि विविध रीचार्ज करण्यारसाठी मदत करत असतात.
एनपीएच्या जोखमीपासून दूर
फिनो पेमेंट्स बँकेने ऋध2019-21मध्ये एकूण महसुलात 46 टक्के उअॠठ नी वाढ दर्शवली आहे व ऋध19मधील 62.3 कोटी रुपयांच्या तोट्यामधून मागील वर्षी कंपनीनं प्रथमच 20 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. कंपनी इतर एनबीएफसी अथवा बँकेबरोबर टाय-अप करून कंपनी लोन देत स्वतःला लोन देण्यापासून दूर ठेवत आहे. त्यामुळं या कंपनीची खास बात म्हणजे कंपनी कोणतेही लोन आपल्या खात्यामध्ये घेत नसल्यानं एनपीएच्या जोखमीपासून ही कंपनी दूर राहिलेली आहे. सध्या तरी कंपनीस थेट स्पर्धक नसून याचा फायदा याच्या प्राथमिक समभाग विक्रीस होऊ शकतो. फिनो पेटेक ही सध्या कंपनीची 100 टक्के प्रवर्तक कंपनी आहे. कंपनीची प्राथमिक समभाग विक्री ही 29 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून किंमतपट्टा 560-577 रुपये ठरवण्यात आलेला आहे. आयपीओ उघडल्यापासून केवळ पहिल्या 15 मिनिटांतच किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीस संपूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. अजूनही दोन दिवस हा आयपीओ खुला राहणार असून दीर्घ मुदतीसाठी या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही.
-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com