पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 20) नव्या 133 कोरोना पॉझिटिव्ह आणि चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर 102 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 90 व ग्रामीण 12) तालुक्यातील 102, पेण 14, माणगाव पाच, उरण, अलिबाग व रोहा प्रत्येकी तीन, श्रीवर्धन दोन आणि खालापूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. मयत रुग्ण खालापूर दोन आणि कर्जत व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रु ग् ण ा ंम ुळ े जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 55,986 आणि मृतांची संख्या 1593 झाली आहे. 53,518 जण कोरोनामुक्त झाल्याने 875 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …