पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्रावण महिना सुरू झाला की, अनेक व्रत व सण उत्सव सुरू होतात. त्यातील एक मंगळागौर आहे. माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या वतीने शनिवारी नवीन पनवेल येथील कालिका माता मंदिर येथे सालाबादप्रमाणे मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली.
या कार्यक्रमात गाणी, फुगड्या, नाच यांसह विविध कार्यक्रम कार्यक्रम सादर करून हसत खेळात तरुणींसह वृद्ध महिलांनी देखील खेळ खेळून नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. दरम्यान पनवेल महानगर पालिका महिला बालकल्याणच्या वतीने महिलांसाठी ब्युटीपार्लर कोर्स तसेच बेकरी बेकिंग, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर प्रशिक्षण दिलेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका सुशीला घरत, रुचिता लोंढे, आयोजक वृषाली वाघमारे, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, पनवेल शहर सरचिटणीस लीना पाटील, स्वाती कोळी, अॅड. प्रतिभा भोईर, मयुरी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …