Breaking News

उरण बेलदारवाड्यातील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण

नागरिकांनी मानले आमदार महेश बालदींचे आभार

उरण : वार्ताहर

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने उरणमध्ये विविध विकासकामे जोरदार सुरूच आहेत. उरण नगर परिषद हद्दीतील मोरा मुख्य रस्त्याजवळील बेलदारवाडा येथे चिंचेच्या झाडापासून दगडी खाणीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. त्याबद्दल येथील नागरिकांनी आमदार महेश बालदी यांचे सोमवारी (दि. 1) संपर्क कार्यालयात जाऊन आभार मानले.

या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, मनन पटेल, लक्ष्मण वाघ, राजकुमार वाल्मिकी, पुष्पा घरत, विमल वाघ, उषा वाल्मिकी, मंदा कोळी, मंजुळा वाढीविंद, साक्षी वाल्मिकी, शुभांगी माडिय आदी उपस्थित होते.

आमदार महेश बालदी व नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. 2चे नगरसेवक नंदु लांबे व नगरसेविका आशा शेलार यांच्या प्रयत्नाने उरण-मोरा रोडजवळील चिंचेच्या झाडापासून ते दगडीखानदरम्यान रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे.

गेल्या 10 वर्षांपासून रस्त्याचे काम झाले नव्हते आज ते काम पूर्ण झाल्याने आम्ही आमदार महेश बालदी, सर्व नगरसेवकांचे आभार मानत आहोत, अशी प्रतिक्रिया या वेळी नागरिकांनी व्यक्त केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply