Breaking News

खारघरमधून चार लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत;

दोन नायजेरियन व्यक्तींना अटक
पनवेल : वार्ताहर
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खारघरमधून 4 लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत केली आहे. याप्रकरणी दोन नायजेरियन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर 12 येथे दोन विदेशी नागरिक अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मदतीने सापळा रचला होता. त्यामध्ये दोन नायझेरियन व्यक्तींना थांबवून त्यांची झडती घेण्यात आली.
या वेळी त्यांच्याकडे चार लाख 40 हजार रुपये किमतीचा मेथँक्यूलॉन हा अमली पदार्थ आढळून आला. याप्रकरणी ओकोके चिबुझू (वय 32) व अब्दुल हसने (वय 34) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून ते अमली पदार्थ विक्री करत होते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply