
भाजप तक्का विभागाचा स्तुत्य उपक्रम
1500 कुटुंबीयांनी घेतला लाभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व श्री युवा प्रतिष्ठान तक्का-पनवेलचे प्रमुख मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री युवा प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते प्रतिक देवचंद बहिरा व भाजप तक्का विभागीय कमिटी यांच्या वतीने 1500 कुटुंबीयांना दिवाळी फराळ सामान वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
कोरोना वैश्विक महामारीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत थोडाफार आधार देण्याच्या दृष्टीकोनातून दिवाळीच्या सणाला दिवाळी फराळ सामानाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा, ज्येष्ठ नेते शंकरशेठ म्हात्रे, सुनील पगडे, जयंत बहिरा, विशाल म्हसकर, सचिन चिखलेकर, डी. एस. घरत, कुणाल म्हात्रे, बबन कांबळे, अण्णा भगत, श्री. नाईक तसेच भाजपचे पदाधिकारी व श्री युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.