Breaking News

श्रीलंकन क्रिकेटमध्ये भूकंप; पगार कपातीमुळे प्रमुख खेळाडूंचे बंड; नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार

कोलंबो ः वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षांपासून मैदानातील कामगिरी खालावलेल्या श्रीलंकन क्रिकेटमध्ये आता भूकंप झाला आहे. श्रीलंकेचा माजी कॅप्टन अँजलो मॅथ्यूज, सुरंगी लकमल, दिमूथ करुणारत्ने आणि दिनेश चंडीमल या प्रमुख खेळाडूंनी त्यांच्या पगारात कपात केल्यामुळे नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या खेळाडूंच्या पगारात कपात केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

भारतामध्ये 2023 साली होणार्‍या क्रिकेट वर्ल्ड कपला डोळ्यांसमोर ठेवून वन डे आणि टी-20साठी एक नवी आणि तरुण खेळाडूंची टीम तयार करणार असल्याचे संकेत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये वरिष्ठ खेळाडूंना कमी संधी मिळणार असल्याने बोर्डाने त्यांच्या पगारात कपात केली आहे. श्रीलंकतील मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार अँजलो मॅथ्यूज याच्या पगारात 50 हजार अमेरिकन डॉलर्सची कपात करण्यात आली आहे. त्याला मागच्या वर्षी 1.30 लाख डॉलर्स पगार होता. यंदा त्याला 80 डॉलर्स पगाराची ऑफर देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या टेस्ट टीमचा कॅप्टन दिमूथ करुणारत्ने याचा पगार 30,000 डॉलर्सने कमी करण्यात आला आहे. करुणारत्ने याने या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध चांगला खेळ केला होता. बांगलादेशविरुद्ध त्याने तीन इनिंगमध्ये 427 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला मागच्या वर्षीइतका पगार मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्याला 70 हजार डॉलर्सची ऑफर देण्यात आली आहे. सुरंगा लकमल आणि दिनेश चंडीमलला 45 हजार डॉलर्स पगार देण्याचा निर्णय श्रीलंकन बोर्डाने घेतला आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्ड लवकरच वार्षिक करार केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर करणार आहे. यामध्ये निराशेन डिकवेला आणि धनंजय डीसिल्वा यांना सर्वांत जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांना एक लाख डॉलर्स पगार मिळेल अशी माहिती आहे. मागच्या महिन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त पदार्पण केलेल्या पथूम निसांकाला 55 हजार डॉलर्स, तर कसू रजिताला 50 हजार डॉलर्स पगार मिळण्याची अपेक्षा आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply