Breaking News

चिंचोडी पाटील विद्यालयाला नवसंजीवनी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मानले आभार

पनवेल ः प्रतिनिधी
दुर्गम भागात असलेल्या विद्यालयाला नवसंजीवनी दिल्याबाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे चिंचोडी पाटील येथील ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील गावामध्ये 1960 साली रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. या विद्यालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने पावसाळ्यात छप्पर गळती व इतर कारणाने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना शिक्षणात खूप गैरसोय होत होती. त्यामुळे नवीन इमारत बांधण्याच्या दृष्टिकोनातून विद्यालय व स्कूल कमिटीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आर्थिक मदत करून या विद्यालयाला नवसंजीवनी दिली असून या इमारतीच्या बांधकामाचे काम प्रगतिपथावर आहे.
याबद्दल स्कूल कमिटीचे चेअरमन आबासाहेब कोकाटे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब पवार, सदस्य साहेबराव कोकाटे, मुख्याध्यापक भागवत राठोड, शिक्षक डी. एस. पाचारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले.
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, तसेच अनिल कोकाटे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply