Breaking News

माथेरानच्या दरीत आढळला मृतदेह

कर्जत : बातमीदार

माथेरानच्या सिलिया पॉईंटच्या दरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. येथील शारलोट लेकच्या बाजूला असलेल्या सिलिया पॉईंटच्या खाली 700 फूट दरीत दुर्गंधी येत होती. त्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे माथेरान पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसाार हवालदार सुनील पाटील, पोलीस नाईक रुपेश नागे, पोलीस नाईक महेंद्र राठोड घटनास्थळी गेले. मात्र शोध मोहिमेसाठी त्यांना कोणीही मदतनीस भेटले नाही. नगरपालिकेने कर्मचार्‍यांबाबत सुट्टीचे कारण देत हात वर केले.  अखेर माजी नगरसेवक दिनेश सुतार यांच्या सहकार्यांने सह्याद्री रेस्क्यू टीमचे संदीप कोळी, अमोल सकपाळ व त्यांच्या सहकार्‍यांनी रेस्क्यू साहित्यासह दुपारी 4 वाजल्यापासून शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या दरम्यान मृतदेह त्यांच्या हाती लागला. त्याच्या खिशात आधारकार्ड सापडल्याने त्याचे नाव परेश रणछोडदास मिराणी असल्याचे स्पष्ट झाले असून, तो माजिवाडा येथे राहणारा आहे. मात्र ही हत्या होती की आत्महत्या हे अजूनही स्पष्ट झाले नाही.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply