Breaking News

मराठी साहित्य संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेतील दिवाळी अंक महत्त्वाचा भाग

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
मराठी साहित्य संस्कृतीला उज्ज्वल परंपरा असून दिवाळी अंक यातील एक महत्त्वाचा भाग आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) येथे केले.
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद वालेकर संपादित दै. किल्ले रायगडच्या 55व्या, अविनाश कोळी संपादित सा. हक्काचे व्यासपीठच्या सातव्या, अनिल राय संपादित सा. स्टार पनवेलच्या पाचव्या आणि मनोज घोसाळकर संपादित सा. रोहा टाईम्सच्या 15व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
मराठी साहित्याचे क्षेत्र हे भव्य आणि दिव्य आहे. या साहित्याला इसवी सनाच्या बाराव्या शतकापासून, म्हणजे सुमारे साडेआठशे वर्षांची परंपरा आहे.
यात संतसाहित्य, पंतसाहित्य, तंतसाहित्य, इंग्रजी आमदानीतील मराठी साहित्य, स्वातंत्र्यपूर्व साहित्य, स्वातंत्र्योत्तर साहित्य, आधुनिक साहित्य, साठोत्तरी साहित्य, 1990नंतरचे साहित्य असे परिणामकारक टप्पे आहेत. काव्य, कादंबरी, कथा, लेख, नाटक इत्यादी अनेकानेक साहित्यप्रकार हे मराठी साहित्यात संपन्नतेने हाताळले गेलेले आहेत. त्या अनुषंगाने विविध माहितीने नटलेला दिवाळी विशेषांक हा साहित्य संस्कृतीतीमधील अनमोल ठेवा आहे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले.
या प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिद्ध गझलकार ए. के. शेख, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, गणेश कोळी, रत्नाकर पाटील, दै. किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, प्रदीप वालेकर, सा. हक्काचे व्यासपीठचे संपादक अविनाश कोळी, स्टार पनवेलचे संपादक अनिल राय, सा. रोहा टाईम्सचे संपादक मनोज घोसाळकर, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, विवेक पाटील, मंदार दोंदे, हरेश साठे, विशाल सावंत, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, अनिस मनियार, राज भंडारी, विशाल सावंत, विकास पाटील, छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर, प्रवीण मोहोकर, कोमल कोळी, विकास घरत, सुमेधा लिम्हण, परेश सेठे, रूपेश तळुसकर, विलास बोडके, विशाल सावंत, शैलेश गावंड, नारायण खुले, रूपेश  भोईर, रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply