Breaking News

आरपीएलची व्यवस्था आंतरराष्ट्रीय लीगच्या दर्जाची

आमदार आशिष शेलार यांचे गौरवोद्गार; स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड प्रीमियर लीगची (आरपीएल) व्यवस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील लीगच्या दर्जाची असल्याचे गौरवोद्गार माजी शिक्षणमंत्री तथा आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि. 2) काढले. आरपीएलच्या दुसर्‍या पर्वाला सुरुवात झाली असून शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मैदानात ही स्पर्धा 12 नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेते आमदार शेलार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
उद्घाटन सोहळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके, शिरढोण ग्रामपंचायतीच्या सरपंच संजना कातकरी, उपसरपंच संगीता चौधरी, सदस्य प्रमोद कर्णेकर, गजानन घरत, विजय भोपी, भाऊ कर्णेकर, राम वाजेकर, रेश्मा वाजेकर, निकिता चौधरी, सानिका कातकरी, मोनाली घरत, भगवान मुकादम, पांडुरंग चौधरी, नारायण चौधरी, जनार्दन वाकडीकर, मोहन कडू, रोहन पाटील, आयोजक मंगेश वाकडीकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
आपल्या मनोगतात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, शिरढोणला क्रांतिवीरांचा वारसा लाभला आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या मैदानात वर्षभर साजरे होत असतात. त्यामुळे पुढच्या पिढीला यातून विविध कार्यक्रम आयोजित करण्याची प्रेरणा मिळेल.
या वेळी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी व पद्मभूषण पांडुरंगशास्त्री आठवले क्रिकेट स्टॅण्डचे उद्घाटन आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले.
रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 127व्या जयंतीनिमित्त अचानक मित्र मंडळ व शिरढोण ग्रामस्थांच्या वतीने आरपीएल आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यु ट्यूबद्वारे थेट प्रक्षेपणही केले जात असून दर्शकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply