Breaking News

वाहतूक पोलिसांनी दिला अपंग व्यक्तीच्या सायकलला आधार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पोलीस म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे केवळ एक कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व. मात्र या पोलिसी वर्दीमध्ये एक मायाळू देवदूतदेखील दडला असल्याचा प्रत्यय पनवेलकरांना आला. मंगळवारी (दि. 22) संध्याकाळी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नल पॉईंटजवळ आपले कर्तव्य निभावत असलेले पोलीस हवालदार गावडे यांना एक अपंग व्यक्ती त्यांच्या तीनचाकी सायकलवरून उड्डाणपुलावरून जात असल्याचे दिसले. त्या व्यक्तीला नवीन पनवेल उड्डाणपुलावरील चढण पार करताना त्रास होत होता. त्या अपंग व्यक्तीची दमछाक पाहून पोलीस हवालदार गावडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यामुळे पोलिसांमधील माणुसकीचा प्रत्यय पनवेलकरांना आला. हवालदार गावडे यांच्या या कृतीमुळे नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठांनी देखील गावडे यांचे कौतुक केले आहे. तसेच त्या अपंग व्यक्तीने देखील गावडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply