Breaking News

सरकारी कर्मचार्यांचे मुरूडमध्ये ठिय्या आंदोलन

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

मुरूड : प्रतिनिधी

पीएफआरडीए कायदा रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरूडमधील सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांनी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 2) ठिय्या आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदनही दिले.

जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करा, यासाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांनी आपल्या संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुरूडमधील सरकारी कर्मचार्‍यांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. संघटनेच्या मुरूड शाखेचे अध्यक्ष रिमा कदम, सरचिटणीस सचिन राजे, मंडळ अधिकारी विजय म्हापुस्कर, जिविता ठाकूर, आरती पैर, केतन भगत, सुग्रीव वाघ यांच्यासह तलाठी, आरोग्यसेवक, कृषी सहाय्यक, वनरक्षक, ग्रामसेवक इत्यादी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी आंदोलकांच्या प्रतिनिधींनी निवासी नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply