Breaking News

कळंबोलीत विकासकामांचा झंझावात

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करीत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या भूमिकेतून अशीच विकासाची कामे करीत राहणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) केले. महापालिकेच्या माध्यमातून कळंबोली येथे करण्यात येणार्‍या रस्ते, गटारे, स्मशानभूमीच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने महापालिका क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे. त्या अंतर्गत बुधवारी कळंबोली येथे सुनील भगत यांच्या घरापासून ते संदीप भगत यांच्या घरापर्यंत, श्रीपद भगत चाळीपासून ते बैठक हॉलपर्यंत काँक्रिट रस्ता तयार करणे, आदिवासीवाडीतील गटारे, ड्रेनेज लाईन व रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, कळंबोली गावातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे, नारायण जाधव चाळ ते कातकरीवाडीपर्यंत गटार बांधणे, कळंबोलीतील स्मशानभूमी ते शर्मा बेकरीपर्यंत आणि महेश मोहिते यांच्या घरापासून ते महिला मंडळ कार्यालयापर्यंत रस्ता बांधण्याचे काम होणार आहे.
या कामांच्या शुभारंभावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘ब’चे सभापती समीर ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, अमर पाटील, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, सरचिटणीस दिलीप बिस्ट, महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा निकम, सरचिटणीस दुर्गा सहानी, प्रकाश शेलार, संदीप भगत, मुन्ना भगत, किशोर खानावकर, केशव यादव, जोहेब पटेल, श्रीकांत ठाकूर, रवी जाधव, राजू दळवी, मयूर खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, मुन्ना भगत, संदीप भगत तसेच ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने ही कामे सुरू झाली आहेत.
पनवेल महापालिका हद्दीतील जनतेने विकास करण्यासाठी  भाजपवर विश्वास टाकला आहे. हा विश्वास सार्थ ठरवत भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन महासभेत ठराव मंजूर करून घेतल्यामुळे ही विकासाची कामे होत आहेत. ज्यांनी कर्नाळा बँक लुटली आणि सर्वसामान्य नागरिकांना रडायला लावले त्यांनी विकासाच्या गप्पा न करता कर्नाळा बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांचे पैसे कसे परत करणार? लुटलेले पैसे कुठे लपवले? कोणा कोणाला निवडणूक लढवायला दिले हे सांगितले पाहिजे आणि हे जर सांगता येत नसेल तर जनतेप्रति खोटा कळवळा आणू नये, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी विरोधकांवर केली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply