Breaking News

भाजपतर्फे कर्जतमध्ये फराळाचे वाटप

कर्जत : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षातर्फे कर्जत नगर परिषदच्या सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी  शहरातील कचरा साफ करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने कर्जत भाजपच्या वतीने सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप

करण्यात आले.

भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे यांच्या कर्जतमधील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक बळवंत घुमरे भाजपचे शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे, उपाध्यक्ष प्रीती तिवारी, सहसंयोजक मिलिंद खंडागळे, युवा मोर्चाचे सर्वेश गोगटे, राहुल मसणे, अभिषेक तिवारी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply