Breaking News

भरकटलेले जहाज पुन्हा जेएनपीटी बंदरात दाखल

उरण : प्रतिनिधी

जेएनपीटी बंदरातुन करपांईट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनार्‍याजवळ भरकटले टॅगनोया नावाचं मालवाहू जहाज अखेर गुरुवारी जेएनपीटीने पुन्हा बंदराच्या न्हावा बेस जवळील करपांईटमध्ये आणले आहे.

जेएनपीटी बंदरातुन टॅग ऑफशोअर कंपनीचे टॅगनोया हे मालवाहू जहाज मागील काही दिवसांपासून करपांईट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनार्‍याजवळ भरकटले होते. एकही कर्मचारी नसलेल्या भरकटलेल्या या जहाजामुळे मात्र घारापुरी बेटाला समुद्राखालुन वीजपुरवठा करणार्‍या वीज वाहिन्यांना धोका निर्माण झाला होता. घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबत माहिती देऊन जेएनपीटीचे लक्ष वेधले होते.

तसेच याबाबत विविध वृत्तपत्रांत वृत्तही प्रकाशित झाली होती. वृत्त प्रकाशित होताच जेएनपीटी बंदर प्रशासनाने तातडीने कारवाई करीत भरकटलेले जहाज काल सुरक्षितपणे बंदराच्या न्हावा बेस येथील करपांईटमध्ये आणले आहे. जहाज पुन्हा करपांईटमधून बाहेर भरकटणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती जेएनपीटी नियंत्रण कक्षातुन देण्यात आली आहे.

Check Also

उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …

Leave a Reply