Monday , February 6 2023

अलिबाग समुद्रकिनारा चकाचक

अलिबाग : केंद्र  सरकारच्या आवाहनानुसार स्वच्छता पंधरवडाअंतर्गत 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत ’प्लॉगिंग’ (डस्टिंग वेस्ट कलेक्शन) प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात  अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयाच्या एनसीसी आणि एनएसएस युनिटतर्फे शनिवारी (दि. 7) अलिबाग समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. या समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्यासह इतरही विद्यार्थी सहभागी झाले होते.

अंबिका माता मंदिराचा वर्धापनदिन

कडाव : कर्जत तालुक्यातील आंबोट येथील अंबिका माता मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी संपूर्ण गावातून हरिनामाच्या जयघोषात श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा व रात्री ‘सूर नवा ध्यास नवा‘फेम गायिका सई जोशी हिने भावगीते, भक्तिगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.अंबिका माता मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आंबोटमध्ये शुक्रवारी सकाळी पालखी सोहळा आणि सायंकाळी सामुदायिक हरिपाठ झाल्यानंतर रात्री ‘सूर नवा ध्यास नवा’फेम गायिका सई जोशी, गायक रोहन आंबेकर, दिगंबर जाधव, तबला रोहित देसाई, कमलाकर मेस्त्री, निरंजन करडे आदी कलाकारांनी मराठी भावगीते, भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबोटमधील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply