Breaking News

पालिकेतील भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करा

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेत वारंवार होणार्‍या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करावी, अशी लेखी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. 

आमदार म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे की, बेलापूर विभाग कार्यालयातील दोन अधिकारी व कोपरखैरणे विभाग कार्यालयातील एलबीटी अधिकारी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. ही अतिशय गंभीर घटना असून मनपाच्या विविध  विभागातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी वारंवार केली आहे, परंतु या बाबत आयुक्तांनी उत्तर दिले नाही. भ्रष्टाचाराची चौकशी केली की नाही याचेही उत्तर मिळाले नाही. 

उद्यान घोटाळ्यात झालेला साडे आठ कोटींचा घोटाळा तसेच कंत्राटी कामगार भरती करताना बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळून स्थानिकांना डावलून शहराबाहेरील तरुणांची केलेली नोकर भरती आदींची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. महापालिका प्रशासन भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना पाठीशी घालत आहे, तर दुसरीकडे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच्या जागेवर   बांधलेल्या घरावर नोटिसा पाठवून पैशाची मागणी करत आहे 

तोडक कारवाईच्या नोटीसा पाठवून भ्रष्टाचार करीत आहे.   संपूर्ण राज्यात नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक असताना कामांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. मी वारंवार मागणी केलेल्या भ्रष्टाचाराची पुन्हा उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर त्वरित करावी.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply