Breaking News

पनवेलच्या नवीन कोर्ट परिसरात वाहतूक कोंडीवर कारवाई

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील नवीन कोर्ट परिसरात काही दुचाकी तसेच चारचाकी, रिक्षा आदींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन या भागातील रहिवाशांना नेहमीच त्रास झाला होता. या संदर्भात परिसरातील जागरूक नागरिकांनी पनवेल वाहतूक शाखेकडे तक्रार करताच अशा प्रकारांच्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नवीन कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम न पाळता या ठिकाणी येणारे नागरिक आपली दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, रिक्षा ही उभी करून जातात. त्याचा नाहक त्रास या भागातील स्थानिक रहिवाशांना होत होता. वेडीवाकडी वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडीही होत होती. याबाबत या भागातील जागरूक नागरिकांनी पनवेल वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारींच्या आधारे पनवेल वाहतूक शाखेने टोईंग गाडीच्या माध्यमातून या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

याठिकाणी नो पार्कींगचे फलक लावूनही काही वाहनचालक या फलकाकडे दुर्लक्ष करून आपली वाहने त्याच ठिकाणी उभी करत असल्याने येथील स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

बाहेरून येणारी माणसे आपली वाहने येथे बेजबाबदारपणे लावत असल्याने आम्हाला स्थानिकांना आमच्या सोसायटीत जायला सुद्धा रस्ता मिळत नाही. तसेच वाहनेही आतून काढता येत नाहीत. तरी वाहतूक शाखेने ही कारवाई नियमित सुरू ठेवावी.

-अतुल भोईर, चेअरमन, निल पार्क सोसायटी

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply