Breaking News

मुरूड बांधकाम खात्याची चौकशी करा

समन्वय समितीचे अध्यक्ष जयवंत अंबाजी यांचे आदेश

मुरूड : प्रतिनिधी

मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम खाते हे बोगस कामांना प्राधान्य देत असून क्वॉलिटी कंट्रोल बोर्डाकडून कोणतेही प्रमाणपत्र न आणता ठेकेदारांना बिल अदा केले जाते.जेव्हा रस्त्याची कामे सुरु असतात तेव्हा मुरुड तालुक्यासाठी दोन अभियंते हे काम सुरु असताना उपस्थित राहत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे फावले जाऊन रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवण्यास हे अभियंते प्रोत्सहन देत असतात. सन 2015 पासून मुरुड तालुक्यात जेवढे रस्ते बनले आहेत.त्याची चौकशी करण्याचे मी आदेश देत असून या बांधकाम खात्याची चौकशी करण्याचे आदेश यावेळी तहसीलदार याना मुरुड तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष जयवंत अंबाजी यांनी दिले आहेत.

मुरुड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची सभा मुरुड तहसीलकार्यालयात झाली. या सभेच्या अध्यक्ष जयवंत अंबाजी असून त्याच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती.   यावेळी या सभेस तहसीलदार परीक्षित पाटील,नायब तहसीलदार रवींद्र सानप, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, समन्वय समिती सदस्य प्रवीण बैकर, दीपक गीते, अलका मोनाक, जीवन सुतार, तेजस्विनी भोबू,सुरेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी उपस्थित पत्रकारांनी एखाद्या खात्याची चौकशी करण्याचे अधिकार तालुका समन्वय समितीला नसतात. मग आपण बांधकाम खात्याची चौकशी कशी करू शकता असा प्रश्न समन्वय समितीच्या अध्यक्ष जयवंत अंबाजी याना केला.

फणसाड धरणावरून भोईघर मांडला, बोर्ली व कोर्लई या चार ग्रामपंचायतीना पाणी पुरवठा होतो.परंतु मुख्य जलवाहिनी जीर्ण झाल्याने या ग्रामपंचायतीना पाणीपुरवठा होत नाही. शिखर पाणी योजना यासाठी या समन्वय समितीमध्ये ठराव घेण्यात येऊन पाणी योजनेची नवीन स्कीम राबवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले.

या वेळी उपस्थित नागरिकांनी मुरुड आयटीआय इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार या प्रश्नाला उत्तर देताना निलेश खिल्लारे यांनी 31 एप्रिल पर्यंत इमारत ताब्यात देणार असल्याचे यावेळी सांगितले. मुरुड येथील वीज उपकेंद्राचे उद्धघाटन करताना ऊर्जा मंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री याना आमंत्रण न देता सदरचा कार्यक्रम घाईघाईने उरकण्यात आला याविषयी जयवंत अंबाजी यांनी नाराजी व्यक्त करून निषेध व्यक्त केला. मुरुड तालुक्यात कार्यरत ग्रामसेवक यांच्या बद्दल असंख्य तक्रारी आहेत. यासाठी समन्वय समितीच्या सर्व सदस्यांनी वेगळी सभा गट विकास अधिकारी यांच्याकडे मागितली असता, लवकरच सदरची सभा आयोजन करण्यात येईल असे आश्वासन गट विकास अधिकारी राजनंदनी भागवत यांनी सांगितले.      तालुका समन्वय समितीच्या सभेस जे अधिकारी उपस्थित नाहीत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी असे आदेश यावेळी अंबाजी यांनी दिले.     सदरील सभेस महारष्ट्र मेरीटाईम बोर्ड, खारभूमी, कृषी, आरोग्य, एसटी आगार आदी प्रश्नावर चर्चा होऊन सदरचे प्रश्न अधिकारी वर्गांनी लवकरात लवकर सोडवून जनतेसाठी ष्ट्परतेने काम करा असे यावेळी अंबाजी यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला आदेश दिले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply