Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या झंझावाती प्रचार सभेने श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित; उपमहापौर विक्रांत पाटील यांचा दावा

पनवेल : वार्ताहर

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासाठी कामोठे येथे झालेली विजय संकल्प सभा व त्या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दणदणीत मार्गदर्शन यामुळे बारणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी देण्यात आली असून महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी दिवस-रात्र एक करीत आहेत. केंद्राच्या माध्यमातून श्रीरंग बारणे यांनी केलेली कामे तसेच आणलेला विकास निधी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल व उरण तालुक्यात केलेली विकासकामे आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या अनेक विकासाच्या योजनांमुळे लोकांचा पूर्ण विश्वास महायुतीवर आहे. त्याचप्रमाणे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर असो अथवा उरणचे आ. मनोहर भोईर असो, यांच्या माध्यमातून विविध योजना व विकासकामे करण्यात आली आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल तसेच स्वतः मी

उपमहापौरपदाच्या माध्यमातून पनवेल शहरासाठी केलेली कामे आणि यासाठी महत्त्वाचे सहकार्य सभागृह नेते परेश ठाकूर यांचे लाभल्याने पनवेल शहराचा कायापालट करीत असल्याचा आनंद आम्हाला होत आहे, असेही उपमहापौर विक्रांत पाटील यांनी नमूद केले.

-येत्या काही महिन्यांतच पनवेलमध्ये विकासकामे झालेली लोकांना प्रत्यक्ष दिसतील. त्यादृष्टीने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कामे सुरू आहेत. या सर्व कामाच्या जोरावर आम्हाला मत मागण्याचा हक्क आहे व त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा विजय निश्चित  आहे.

-विक्रांत पाटील, उपमहापौर

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply