खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील चिंचवली शेनगाव ते मानकीवली रस्त्यावर धुळीचे प्रचंड प्रमाणात धुळीचे साम्राज्य असून, या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक, तसेच परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे.
नगरपालिका हद्दीतील काही भाग व पुढे जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील हा रस्ता येथून जाणार्या दगड खाणीच्या वाहनांमुळे धोकादायक झाला आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे अनेकदा दुरुस्ती करण्यात आलेल्या या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे, रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहे खड्ड्यांमुळे पावसाळ्यात चिखल व आता धुळीचे साम्राज्य हा रस्त्यावर अनुभवास मिळत आहेत. त्याचप्रमाणे उडणार्या धुळीमुळे परिसरातील ग्रामस्थांना खोकला व दम्याचा त्रास होत असल्याने, नागरिकांनी याबाबत संबंधित खात्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. परिसरातले खाणमालक संबंधित खात्याच्या अधिकार्यांना चिरीमिरी देऊन प्रकरण रफादफा करीत असल्याची ग्रामस्थांत उघडपणे चर्चा आहे. या परिसरातल्या स्वयंघोषित नेते, पुढारी धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरत असतात, अशी चर्चा आहे.