Breaking News

भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी शेखर तांडेल

उरण : वार्ताहर – भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीमध्ये आमदार महेश बालदी यांचे कट्टर समर्थक आणि उरण तालुक्याचे माजी युवा मोर्चाचे डॅशिंग अध्यक्ष शेखर तांडेल यांची उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.

शेखर तांडेल यांची निवड झाल्याने उरणचे आमदार महेश बालदी, उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, कामगार नेते सुधीर घरत, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, खालापूर तालुका भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस स्वप्निल मुकादम, तेजेश पाटील, निलेश घरत, समाधान भोईर, गौरव कोळी, ज्ञानेश्वर भोईर, संदीप भोईर, शक्ती ठाकूर, रवी वाजेकर आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेखर तांडेल यांनी नवघर सरपंचपद भूषविले होते. लॉकडाऊन कालावधीत नवघर ग्रामपंचायत हद्दीतील झोपडपट्टीतील गरीब-गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांनी केले. सरपंच असताना नवघर गावातील विकासाची कामे केली आहेत. त्यांची कामाची दखल भाजप घेत आहे. या कामाची दखल घेऊनच त्यांची उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply