पनवेल : रामप्रहर वृत्त
रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरच्या वतीने महाळुंगी येथे जाऊन वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात अनेक प्रकारची सुमारे तीस झाडे लावून समाजाला एक रोटरीच्या माध्यमातून चांगला संदेश देण्यात आला. त्याचप्रमाणे शेतात जाऊन रोटरीच्या सदस्यांनी स्वतः शेतीची कामे केली.
गावातील लोकांना स्वच्छतेबाबत माहिती दिली. तेथील काही आदिवासी मुलांना खाऊवाटप करून त्यांना सुद्धा साबण, सॅनिटायझर देऊन स्वच्छतेबाबत माहिती देण्यात आली. शेतात काम करणार्या बंधू-बगिनींना मास्कचे वाटप करण्यात आले.
रोटरीच्या सर्व सदस्यांनी स्वतः शेती लावण्यात सहभागी होऊन शेताच्या बांधावरच सर्वांनी जेवण केले. एका दिवसात आपण हे सर्व करू शकलो, खरेच मनाला खूप समाधान झाले आणि आपण सर्वांनी मिळून अगदी धमाल केली, असे रोटरीच्या सदस्यांनी सांगितले.
हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. दीपक खोत, अलका कोळी, मुकुंद चौधरी, विशाल पाटील, स्नेहल, महेंद्र मारू, आदित्य साठे, नवीन मेंबर अमोल भागीवंत, चेतन शाह, अॅड. श्रद्धा देशपांडे, रवी नाईक आदींनी मेहनत घेतली.