अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग-मुरूडमधील डॉक्टरांनी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अलिबागजवळील आरसीएफ वसाहतीमधील क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय उपचाराबरोबरच शरीर फिट ठेवण्यासाठी वैयक्तिक व सांघिक खेळ महत्त्वाचे असल्याचा संदेश यातून देण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अलिबाग व मुरूड मेडिकल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, बॅटमिंटन, कॅरम, टेबल टेनिस आदी खेळ खेळले गेले. या स्पर्धेत एकूण 153 डॉक्टरांसह त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले. स्पर्धेचा शुभारंभ शरीर सौष्ठव स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणारे सचिन पाटील, प्रो-कबड्डीपटू केदार लाल, तसेच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या रायगड पोलीस दलातील जिया चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी डॉ. मयूर कल्याणी, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. अशिष भगत, डॉ. गणेश गवळी, डॉ. महेंद्र दोषी, डॉ. अनघा भगत, डॉ. रवी म्हात्रे, डॉ. राजेंद्र मोकल, प्रमोद खानावकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …